सोलापूरची तरुणाई गिटारच्या प्रेमात
By Admin | Updated: April 6, 2015 03:22 IST2015-04-06T03:22:45+5:302015-04-06T03:22:45+5:30
शास्त्रीय संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण पाश्चात्त्य वाद्यांची मोहिनीही कमी नसते. त्याकडे बहुतांश युवावर्ग आकर्षित होतो. असाच

सोलापूरची तरुणाई गिटारच्या प्रेमात
सोलापूर : शास्त्रीय संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याकडे अनेकांचा कल असतो. पण पाश्चात्त्य वाद्यांची मोहिनीही कमी नसते. त्याकडे बहुतांश युवावर्ग आकर्षित होतो. असाच काहीसा प्रत्यय सध्या सोलापुरात येत आहे. तेथे आता पारंपरिक भारतीय वाद्यांच्या तालात पाश्चात्त्य गिटारचे सूरही कानी पडत आहेत.
सोलापुरातील दत्त चौक परिसरात आजही सकाळी शास्त्रीय वाद्य, संगीताच्या तयारी वर्गातील आवाज कानावर पडतो. त्याच्या बरोबरीनेच या शहरात आता पाश्चात्त्य वाद्ये आणि संगीत मनामनात घर करू लागले आहे. अगदी महाविद्यालयीन तरुणाई गिटारच्या प्रेमात पडलेली दिसते. सौरभ हुंडेकरी आणि रवी कोळी या पंचवीशीतील दोन कलाकारांनी पाच वर्षांत ४००हून अधिक विद्यार्थ्यांना गिटारचे प्रशिक्षण देऊन एक चांगली फळी तयार केली आहे़ बॉलीवूड चित्रपटांतील काही गाणी ही गिटाराच्या ट्यूनमुळे लोकप्रिय होत असल्याची उदाहरणे त्यांनी दिली़