शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरी रेडिमेड कपडे देशात अव्वल, प्रतिवर्षी पाचशे कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:16 IST

सोलापुरातील युनिफॉर्मचा व्यवसाय तेजीत; गारमेंट उद्योगाने टाकली कात

ठळक मुद्देसोलापुरी रेडिमेड कपडे आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहेविदेशी मार्केटचे लक्ष वेधून घेण्याकरिता मुंबईत आंतरराष्ट्रीय रेडिमेड कपड्यांचे प्रदर्शन होणारया प्रदर्शनात सोलापुरातील तब्बल ६४ उत्पादक सहभागी होणार

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : होय, सोलापूरकरांसाठी एक गुड न्यूज आहे़ सोलापुरी चादरीनंतर आता सोलापुरी रेडिमेड कपडे जगाची सवारी करायला तयार आहे़ देशाच्या कानाकोपºयातील रेडिमेड कपडे व्यापारी सोलापूर कपड्यांना प्राधान्य देत आहेत़ या उद्योगात तब्बल पाचशे कोटींहून अधिक उलाढाल झाली आहे.

स्कूल युनिफॉर्म आणि कॉर्पोरेट ड्रेसकोडन्सारख्या कपड्यांना मोठी मागणी येत असल्याने येथील रेडिमेड कापड उत्पादक आणखी उत्साहाने व्यापार वृद्धीकरिता विविध उपक्रम तसेच अभियान राबवताहेत़ प्रतिवर्षी येथील गारमेंट उद्योगात तब्बल पाचशेहून अधिक कोटींची उलाढाल होत आहे़ आता त्यांनी जागतिक बाजारपेठांकडे लक्ष केंद्रित केले आहे़येथील रेडिमेड उत्पादकांनी देशी बाजार टाइट केला असून, आता त्यांनी विदेशी मार्केटला टार्गेट केले आहे़ त्यादृष्टीने त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

सोलापुरी रेडिमेड कपडे आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे़ विदेशी मार्केटचे लक्ष वेधून घेण्याकरिता मुंबईत आंतरराष्ट्रीय रेडिमेड कपड्यांचे प्रदर्शन होणार आहे़ १७ ते १९ डिसेंबर दरम्यान गोरेगाव येथे प्रदर्शन होत आहे़ विशेष म्हणजे सदर प्रदर्शन सोलापूर रेडिमेड उत्पादक संघाच्या पुढाकारातून होत आहे़ या प्रदर्शनात देश-विदेशातून तब्बल दीडशे उत्पादक सहभागी होणार आहेत़ या प्रदर्शनात सोलापुरातील तब्बल ६४ उत्पादक सहभागी होणार आहेत़ या प्रदर्शनाकरिता शासनाने अनुदान दिल्याची माहिती सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे संचालक राजू शहा यांनी दिली़ उत्तम कापड, उत्तम स्टिचिंग, मजबूत शिलाई, फिनिशिंग देखील उत्तम तसेच चालू मार्केटपेक्षा किफायतशीर दर यामुळे सोलापुरी रेडिमेड कपड्यांनी देशाच्या बाजारपेठांमध्ये लक्ष वेधून घेत आहे़ आंध्र, मराठा, विदर्भ, गोवा, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली यासह इतर अनेक राज्यांत सोलापुरी रेडिमेड कपड्यांना मोठी मागणी आहे.

विदेशात सोलापुरी रेडिमेड कपड्यांची चलती- दुबई येथील कॉर्पोरेट कंपन्यांतील अधिकारी व कर्मचाºयांकरिता सोलापुरात युनिफॉर्म जातो़ दुबईतील बहुतांश टॅक्सी ड्रायव्हरच्या अंगावरील ड्रेसकोड हे सोलापुरी रेडिमेड कामगारांनी शिवलेले आहे़ मध्यंतरी अमित जैन यांच्या फॅक्टरीतून युगांडामधील एअरहोस्टेजमधील कर्मचाºयांना ड्रेसकोड सप्लाय व्हायचा़ येथील दर्शन गारमेंट तसेच इतर गारमेंट फॅक्टरीमधून सध्या दुबई, कतार, उमान, मलेशिया, केनिया, युगांडा, सेनेगल, ट्रान्झानिया यासह इतर अनेक देशांत सोलापुरी युनिफॉर्म्स तसेच फॅन्सी कपड्या मोठ्या प्रमाणात निर्यात होतात़ काही दिवसांपूर्वी युगांडाच्या राजदूत प्रतिनिधीने सोलापूर दौरा केला़ त्यांनी येथील कापड उत्पादक संघाशी चर्चा केली़ येथील उत्पादकांना त्यांच्या देशात व्यापार करण्याचे निमंत्रण दिले़ 

दर्शन युनिफॉर्म्सला देश आणि विदेशातून चांगली मागणी आहे़ येथील अनेक उद्योजक ईस्ट आफ्रिका देशांमध्ये रेडिमेड कपडे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करत आहेत़ विदेशी मार्केटमध्ये अजून वाढ झाली पाहिजे़ इतर रेडिमेड कपड्यांपेक्षा सोलापुरी रेडिमेड कपडे खूप मजबूत आणि दर्जेदार आहेत़ त्यामुळे येथील कपड्यांना खूप मोठी मागणी येत आहे़ सोलापुरात वाहतूक व्यवस्था नाही़ विशेषकरून विमानसेवा नाही़ देशातील बडे व्यापारी सोलापुरात येऊ इच्छितात़ पण त्यांना येथून चांगली वाहतूक सेवा मिळत नाही़ विदेशांचीदेखील मोठी अडचण होते़ येथे चांगला स्कोप आहे़ सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे़ याकरिता सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने पुढाकार घेतला आहे़ - बालाजी शालगररेडिमेड कापड व्यावसायिक

टॅग्स :SolapurसोलापूरInternationalआंतरराष्ट्रीयTextile Industryवस्त्रोद्योग