सोलापूर : भाजपा तालुकाध्यक्षाच्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय? छापा मारून ५ मुलींची सुटका

By Admin | Updated: January 23, 2017 10:57 IST2017-01-23T10:57:52+5:302017-01-23T10:57:52+5:30

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याती टेंभुर्णी येथील असलेला सुमित लॉज भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांच्या मलाकीचा असून तेथे वेश्याव्यवसाय सुरू होता.

Solapur: prostitution business in BJP Taluka school? 5 girls released from raid | सोलापूर : भाजपा तालुकाध्यक्षाच्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय? छापा मारून ५ मुलींची सुटका

सोलापूर : भाजपा तालुकाध्यक्षाच्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय? छापा मारून ५ मुलींची सुटका

>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २३ - गुंडाच्या पक्षप्रवेशावरून भाजपावर टीका हत असतानाच आता सोलापूरातील भाजपाच्या तालुकाध्यक्षाच्या लॉजवर वेश्या व्यवसाय होत असल्याचे उघडकीला आल्याने पक्ष नव्या अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याती टेंभुर्णी येथे असलेला सुमित लॉज भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांच्या मालकीचा असून लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचे उघडकीला आले. पोलिसांनी डमी ग्राहक बनून सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला आणि पाच मुलींची सुटकाही केली. याप्रकरणी कोकाटे आणि ६  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
कोकाटे यांच्या मालकीच्या सुमित हॉटेलमध्ये अवैध प्रकार होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवत हॉटेलमधील अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांना लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पाच मुली आढळून आल्या. ज्या कलाकेंद्रातून मुली आणण्यात आल्या होत्या, त्या कलाकेंद्र चालकासह सहा जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Solapur: prostitution business in BJP Taluka school? 5 girls released from raid