सोलापूरमध्ये नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकले

By Admin | Updated: June 20, 2014 16:04 IST2014-06-20T16:04:07+5:302014-06-20T16:04:07+5:30

सोलापूर येथे विहीरीतील गाळ काढताना क्रेन कोसळून झालेल्या अपघातात नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

In Solapur, nine laborers got trapped under clay dust | सोलापूरमध्ये नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकले

सोलापूरमध्ये नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकले

 

ऑनलाइन टीम
सोलापूर,दि. २०- सोलापूर येथे विहीरीतील गाळ काढताना क्रेन कोसळून झालेल्या अपघातात नऊ मजूर मातीच्या ढिगा-याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. 
सांगोला तालुक्यातील एका गावात शुक्रवारी विहीरीतील गाळ काढण्याचे काम सुरु होते. यादरम्यान विहीरीलगत उभी असलेली क्रेन विहीरीत कोसळली. यामुळे मातीचा ढिगाराही विहीरीत कोसळला व त्याखाली विहीरीत गाळ काढण्याचे नऊ मजूर अडकले. मजूरांना बाहेर काढण्यासाठी बचाव दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: In Solapur, nine laborers got trapped under clay dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.