सोलापूर : मोटारसायकलची जोरदार धडक, दोन ठार
By Admin | Updated: May 3, 2016 17:49 IST2016-05-03T17:49:41+5:302016-05-03T17:49:41+5:30
मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावर कुंभार तलावाजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन भिमराव उर्फ आप्पासाहेब नवघरे व चंद्रकांत कल्लप्पा राजबिदले हे दोघे जागीच ठार झाले

सोलापूर : मोटारसायकलची जोरदार धडक, दोन ठार
ऑनलाइन लोकमत
सोलापूर. दि. ३ : मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावर कुंभार तलावाजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन भिमराव उर्फ आप्पासाहेब नवघरे (वय ४५ रा़ भंडारकवठे) व चंद्रकांत कल्लप्पा राजबिदले (वय ४४ रा़ मंद्रुप) हे दोघे जागीच ठार झाले आहेत़ तर खंडू रामा तुर्भे व राघवेंद्र चंद्रकांत राजाबेंदले हे दोघेजण गंंभीर जखमी झाले आहेत़
भिमराव नवघरे व खंडू रामा तुर्भे हे दोघेजण हिरोहोंडा स्पेल्डर एमएच १३ डीजी ७८८७ वरून मंद्रुपहुन भंडारकवठेकडे जात होते़ तर चंद्रकांत राजाबेंदले व राघवेंद्र राजाबेंदले हे दोघे सेट्रींग काम करणारे पितापुत्र होंडा गाडी एमएच १३ सीसी ९३२ वरून भंडारकवठ्याहुन मंद्रुपला जात होते़ दोघांची निंबर्गी-मंद्रुप रस्त्यावरील जे़जी़पाटील इंग्लिश मेडियम स्कुलजवळील कुंभार तलावाजवळ समोरासमोर जोरदार धडक बसली़ या धडकेत नवघरे व राजबंदिले यांचा मृत्यू झाला़ तर खंडू तुर्भे व राघवेंद्र राजबंदिले हे दोघेजण जखमी झाले़
या अपघाताचे वृत्त समजताचमंद्रुपचे सपोनि अजित त्रिपुटे, उपसरपंच रमेश नवले, भंडारकवठेचे रफीकअहमद मुजावर व इतर बचावकार्य करून जखमींना उपचारासाठी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़