शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Berking; कांदा उलाढालीत सोलापूर बाजार समिती राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:50 IST

नाशिकच्या लासलगावसह अन्य बाजार समित्या पडल्या मागे

ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीत कांद्याला मागील महिनाभर अन्य बाजार समित्यांपेक्षा सर्वाधिक दरसोलापूर बाजार समितीत ३० नोव्हेंबर रोजी कांद्याला राज्यात सर्वाधिक क्विंटलला ९ हजार १०० रुपये दर मिळालानोव्हेंबर महिन्यात दररोज कांद्याची विक्री चढ्या दराने झाली. यामुळे महिनाभराची उलाढालही मोठी

अरुण बारसकर सोलापूर: कांद्यासाठी नावाजलेल्या लासलगाव, पिंपळगाव, उमराणे या नामांकित बाजार समित्यांना मागे टाकत सोलापूरबाजार समिती कांदा विक्री व उलाढालीत राज्यात अव्वल ठरली आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात एकट्या सोलापूर बाजार समितीत ४ लाख ३९ हजार १७ क्विंटल कांदा विक्रीतून १२५ कोटी १९ लाख ४७ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत अव्वल आहे.

कांदा उत्पादन व विक्रीबाबत नाशिक जिल्ह्याचे नाव घेतले जाते. नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामुळेच नाशिक जिल्ह्याला कांद्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र सोलापूर जिल्हाही आता मागे राहिला नाही. नाशिक जिल्ह्याप्रमाणेच सोलापूर बाजार समित्यांमध्येही कांदा विक्री होतो. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बाजार समिती कांदा विक्रीत अव्वल आहे. आॅक्टोबरच्या दुसºया पंढरवड्यापासून कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्याचा उच्चांक दोन डिसेंबर रोजी झाला आहे.

सोलापूर बाजार समितीत कांद्याला मागील महिनाभर अन्य बाजार समित्यांपेक्षा सर्वाधिक दर मिळतो. सोलापूर बाजार समितीत ३० नोव्हेंबर रोजी कांद्याला राज्यात सर्वाधिक क्विंटलला ९ हजार १०० रुपये दर मिळाला तर २ व ३ डिसेंबर रोजी सर्वाधिक १५ हजार रुपये इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये यापेक्षा कमी दर मिळाला होता.

नोव्हेंबर महिन्यात दररोज कांद्याची विक्री चढ्या दराने झाली. यामुळे महिनाभराची उलाढालही मोठी झाल्याचे आकडेवारीनुसार दिसत आहे. एकट्या सोलापूर बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये ४ लाख ३९ हजार १७ क्विंटल कांद्याची विक्री झाली व त्यातून १२५ कोटी १९ लाख ४७ हजार रुपयांची उलाढाल झाली. या महिन्यात २५ दिवस कांद्याचे लिलाव झाले म्हणजे दररोज ५ कोटींचा कांदा विकल्याचे दिसून येते. लासलगाव बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात एक लाख ६ हजार ३८९ क्विंटल आवक व ५१ कोटी ६१ लाख ६३ हजार रुपयांची उलाढाल झाली. 

प्रमुख बाजार समितीतील कांदा खरेदी-विक्रीवर दृष्टिक्षेप..

  • - अहमदनगर बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात एक लाख ६९ हजार ५१६ क्विंटल कांद्याच्या विक्रीतून ८४ कोटी ७५ लाख ८० हजार रुपये इतकी उलाढाल झाली. घोडेगाव उपबाजार समितीत एक लाख ५० हजार ७९ क्विंटल कांद्याची विक्री व ४५ कोटी १२ लाख रुपयांची उलाढाल झाली. 
  • - लासलगावनंतर पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा उल्लेख केला जातो. या बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात ८१ हजार २३७ क्विंटल कांदा विक्रीतून ४० कोटी ५१ लाख ६३ हजार रुपये उलाढाल झाली. 
  • - सटाणा बाजार समितीत ८७ हजार १९७ क्विंटल कांदा विक्रीतून ४४ कोटी ४६ लाख ११ हजार रुपये, देवळा बाजार समितीत ४७ हजार ५१५ क्विंटल  कांदा विक्रीतून १९ कोटी ५८ लाख ९५हजार, चांदवड बाजार समितीत २६ हजार २६१ क्विंटल कांदा विक्रीतून १३ कोटी २२ लाख रुपये, उमराणे बाजार समितीत एक लाख २४ हजार १२६ क्विंटल कांद्याची विक्री झाली. 

लिलावात पारदर्शकता असल्याने पुणे, अहमदनगर,  नाशिक तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यासह कर्नाटकचाही कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येतो. त्यामुळेच ही समिती कांदा विक्रीत राज्यात प्रथम आहे. शेतकºयांचा आडत्यावर विश्वास आहे.- श्रीशैल नरोळेउपसभापती, सोलापूर बाजार समिती

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक