सोलापुरात ८ टँकर
By Admin | Updated: April 13, 2015 11:36 IST2015-04-13T05:11:50+5:302015-04-13T11:36:04+5:30
सोलापूर जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तुलनेने कमी बसण्याची शक्यता आहे़ १२३ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात आज अखेर ७४ टीएमसी पाणी धरणात आहे़

सोलापुरात ८ टँकर
सोलापूर जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तुलनेने कमी बसण्याची शक्यता आहे़ १२३ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात आज अखेर ७४ टीएमसी पाणी धरणात आहे़ यातील १० टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात आहे़ दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यात टँकरची संख्या मोठी असते़ मात्र, योग्य त्या उपाययोजना आणि मुबलक जलसाठ्यामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती नाह़ी़ चारा छावणी, दुष्काळी जिल्हा हे नेहमीचे चित्र बदलत असून, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनीदेखील जलयुक्त शिवार अभियानात खूप मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून गाळ काढणे, पाझर तलावांची दुरुस्ती करणे, विहीर पुनर्भरण आदी अनेक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळेही दुष्काळ कायमस्वरूपी मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत़ जलयुक्त शिवार अभियानातील २८० गावांत राज्यातील सर्वांत मोठी कामे सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत़
१४५ गाव-वाड्यांना
२१ टँकरचा आधार!
एप्रिल सुरू होताच नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली असून,
९ एप्रिलअखेर १४५ गाव-वाड्यांना
२१ शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ जिल्हा परिषदेमार्फत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बागलाण - १ गाव (१), चांदवड - २ (१), देवळा- २ गावे - ५ वाड्या एकूण ७ (१), नांदगाव - ८ गावे - ३९ वाड्या , (२), सिन्नर - ६४ गाव - वाड्या (११), येवला - १९ गावे - ५ वाड्या एकूण-२४ (५) असा एकूण ३८ गावे व १०७ वाड्या मिळून एकूण १४५ गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ आगामी दिवसांत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.