शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

सोहराबुद्दिन प्रकरणी अधिकारी आरोपमुक्त

By admin | Updated: August 20, 2016 01:50 IST

सोहराबुद्दिन व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेंद्र के. अमीन यांची सबळ पुराव्यांअभावी

मुंबई : सोहराबुद्दिन व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेंद्र के. अमीन यांची सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्तता केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही विशेष सीबीआय न्यायालयाने २०१४मध्ये आरोपमुक्त केले. अमीन यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. एम. बी. गोसावी यांनी अमीन यांना आरोपमुक्त केले.सीबीआयच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, सोहराबुद्दिन बनावट चकमकीच्या कटात अमीन सहभागी होते. सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसर बी यांची हत्या केल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी गुजरातच्या पोलिसांनी त्यांचे शव पुरले. त्या ठिकाणी अमीन उपस्थित होते. डॉक्टरकी सोडून पोलीस झालेले अमीन सध्या गुजरातमधील महीसागर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातून आतापर्यंत अमित शाह, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, राजस्थानचे उद्योगपती मिल पटनी, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी. सी. पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक गीता जोहरी, पोलीस अधिकारी अभय चुंदासमा आणि अहमदाबाद जिल्ह्यातील सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी यशपाल चुंदासमा आणि अजय पटेल यांना आरोपमुक्त करण्यात आले आहे.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, गुजरातच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने हैदराबादहून सांगलीला जात असलेल्या सोहराबुद्दिन शेखची गांधीनगर येथे बनावट चकमकीत हत्या केली. त्यानंतर त्याची पत्नी कौसर बीही गायब झाली. कौसर बी या घटनेची साक्षीदार असल्याने पोलिसांनी तिचीही हत्या केली. त्यानंतर या घटनेचा उरलेला एकमेव साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचीही पोलिसांनी २००६मध्ये बनावट चकमकीत हत्या केली.खटला योग्यप्रकारे चालावा, यासाठी सीबीआयने हा खटला गुजरातहून मुंबईच्या न्यायालयात वर्ग करण्यात यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१२मध्ये हा खटला मुंबईच्या न्यायालयात वर्ग केला. (प्रतिनिधी)