ऐश्वर्या हत्याकांडात सोहेल शेखला अटक
By Admin | Updated: September 5, 2016 03:13 IST2016-09-05T03:13:49+5:302016-09-05T03:13:49+5:30
विरारमधील ऐश्वर्या हत्याकांडप्रकरणी विरार पोलिसांनी तिचा प्रियकर सोहेल शेखला शुनिवारी रात्री अटक केली

ऐश्वर्या हत्याकांडात सोहेल शेखला अटक
विरार : विरारमधील ऐश्वर्या हत्याकांडप्रकरणी विरार पोलिसांनी तिचा प्रियकर सोहेल शेखला शुनिवारी रात्री अटक केली. या प्रकरणात पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा निषेध करत विरारमध्ये रात्री कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. या वेळी विरार निरीक्षक आणि डीवायएसपींना निलंबित करा, अशी मागणी करण्यात आली होती.
शुक्रवारी ऐश्वर्या अग्रवाल (१९) या तरुणीची तिचा प्रियकर सोहेल शेख याचा मित्र दीपक वाघरी याने कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली होती. ऐश्वर्याने शरीरसंबंधाला विरोध केल्याने दीपकने हत्या केल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांनी दीपकला ताबडतोब अटकही केली होती. मात्र, हत्याकांडात सोहेलचाही सहभाग असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता. पोलीस कारवाई करीत नसल्याने शनिवारी रात्री विरारमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता.
पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत पोलीस निरीक्षक युनुस शेख आणि डीवायएसपी अनिल आकडे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. तोपर्यंत ऐश्वर्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ऐश्वर्याच्या पालकांनी घेतली होती. कॅण्डल मार्चनंतर पोलिसांनी सोहेलला कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. (वार्ताहर)