सॉक्स, शॉर्ट्समधून सोन्याची तस्करी
By Admin | Updated: June 4, 2015 04:30 IST2015-06-04T04:30:10+5:302015-06-04T04:30:10+5:30
दुबई आणि मादागास्करमधून सोन्याची भारतात तस्करी करू पाहाणाऱ्या दोन प्रवाशांना कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनीटने (एआययु) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून

सॉक्स, शॉर्ट्समधून सोन्याची तस्करी
मुंबई : दुबई आणि मादागास्करमधून सोन्याची भारतात तस्करी करू पाहाणाऱ्या दोन प्रवाशांना कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनीटने (एआययु) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गजाआड केले. या दोघांकडून एकूण ७३ लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले. एकाने हे सोने जीन्स पॅन्टच्या आत घातलेल्या शॉर्टसमध्ये तर दुसऱ्याने सॉक्समध्ये अत्यंत चपखलपणे हे सोने दडविले होते, अशी माहिती एआययूने लोकमतला दिली.
एआयुचे अप्पर आयुक्त मिलिंद लांजेवार यांच्या माहितीनुसार दुबईहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या राजीव मेमन आणि मादागास्करहून परतलेल्या अतुल भिकालाला मेवाडा या प्रवाशाकडून सोने हस्तगत केले. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)