शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंवर 'सोशल स्ट्राईक'; शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटचं नाव बदलताच Blue Tick गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 12:46 IST

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह वापरण्यास मज्जाव केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर नाव बदलण्यात आले आहे.

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात केंद्रीय निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होती. त्यात नुकतेच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. 

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह वापरण्यास मज्जाव केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर नाव बदलण्यात आले आहे. शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या घडामोडीबाबत अपडेट देणाऱ्या शिवसेना या अधिकृत ट्विटर हँडलचे नाव आता शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असं करण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरवरून पक्षाचे Blue Tick गायब झाले आहे. तर शिवसेनेची वेबसाईटही बंद झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर सोशल स्ट्राईक आला आहे. 

उद्धव ठाकरेंनी खेळली नवी खेळीपक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार याची कुणकुण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांना आधीच लागली होती. शिवसेनेच्या पक्षनिधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो, हे ओळखून पक्षनिधीची रक्कम अन्य बँक खात्यात वळविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा पक्षनिधी सुमारे १५० कोटींचा असण्याची शक्यता आहे.

शिवसेना भवन ठाकरेंच्या ताब्यातशिवसेना पक्ष शिंदे गटाला मिळाला असला तरी दादरचे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. शिवसेना भवनवर शिवाई ट्रस्टची मालकी आहे. या ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे जुने-जाणते नेते ॲड. लीलाधर डाके आहेत. त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबातील सदस्यांचाही ट्रस्टमध्ये समावेश आहे. संघर्ष उद्भवणार आहे तो शिवसेना शाखांचा; कारण बहुतांश शाखा त्या विभागातील नेतृत्व म्हणजे विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार यांनी उभारलेल्या आहेत.  या जागांचे रजिस्ट्रेशनही त्यांच्याच नावावर असल्याने ते कोणत्या गटात आहेत, त्यानुसार या शाखांच्या मालकीचा संघर्ष उद्भवू शकतो.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाTwitterट्विटर