नावीन्यपूर्ण देखाव्यांमधून सामाजिक संदेश
By Admin | Updated: September 10, 2016 02:20 IST2016-09-10T02:20:33+5:302016-09-10T02:20:33+5:30
खारघरमध्ये यंदा नावीन्यपूर्ण देखाव्यामधून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबविला आहे.

नावीन्यपूर्ण देखाव्यांमधून सामाजिक संदेश
वैभव गायकर,
पनवेल- खारघरमध्ये यंदा नावीन्यपूर्ण देखाव्यामधून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबविला आहे. देखाव्यात मंडळाने महाड दुर्घटना, स्त्रीभ्रूणहत्या आणि रायगड किल्ल्यातील शिवाजी महाराजांचे दरबार तर बहुतांश मंडळाने महलचा देखावा साकारून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.अनेक मंडळे आकर्षक रोषणाई, मोठे डेकोरेशन याकडे लक्ष देत असतात. मात्र खारघरमधील मंडळांनी राबविलेला हा हटके उपक्र म असल्याने भक्तदेखील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी व देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
खारघर सेक्टर एकोणीस मधील श्री बालाजी मित्र मंडळाने महाड जवळील सावित्री नदीवरील दुर्घटना, कोसळलेली बस, पूल बेपत्ता प्रवाशांचे एनडीआरएफच्या आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुरु असलेला शोधकार्याचा देखावा तयार करून गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. सेक्टर वीस शिल्प चौक मधील श्री गणेशिमत्र मंडळाने बाहेरून रायगड किल्ला आतील तर आत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा दरबार हा देखावा साकारला आहे. किल्ल्यांचे संवर्धन हे यामागचे उद्देश असल्याचे मंडळाचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील यांनी सांगितले. तर वास्तुविहार सोसायटी मित्र मंडळाने श्रीची आकर्षक मूर्तीची स्थापना उभारून श्रीच्या चाहुबाजूने स्त्रीभ्रूणहत्या संदेश देऊन पहिली महिला डॉक्टर आनंदी जोशीपासून कल्पना चावला, भारतरत्न लता मंगेशकरापासून नुकताच रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचे नाव उज्वल करणाऱ् पी व्ही सिंधू,साक्षी मलिक, दीपा कर्माकर आदी महिलांचे कार्य देशासाठी किती भूषणावह आहे, याविषयी दिलेली माहिती लक्ष वेधून घेत आहे. सेक्टर एकोणीसमधील शेतकरी कामगार पक्ष, श्री समर्थ मित्र मंडळाने श्री च्या पाठीमागील बाजूस पंढरपूर येथील विठ्ठलाचे साकारलेले चित्र आणि गुरु ठाकूर यांचा श्री सिद्धिविनायक उत्सव मित्र मंडळाने राजवाडाचा देखावा उभा केला आहे. खारघर सेक्टर अठरा मधील मधील श्री गणेश मित्र मंडळाने जाणता राजा तर बाप्पा मोरया गणेश मंडळाची आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आह. खारघर वसाहतीमधील पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरचा राजा गणेशमंडळांने देशभक्तीचे फलक उभारून मंत्रालयात गरजू रुग्णासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या नावाने सुरु करण्यात आलेल्या योजनेचे माहिती उपलब्ध करून दिली आहे. सेक्टर पंधरा घरकुल रहिवासी संघाने दरवर्षीप्रमाणे लाल बागचा राजा तर मंगलमूर्ती मंडळ तसेच सेक्टर चारमधील सह्याद्री मित्र मंडळाने बर्फाळ प्रदेशच तर सेक्टर दोन,आठ आणि दहामधील सुखकर्ता मित्र मंडळाने महलचा देखावा तयार केला आहे.