सोशल मीडियामुळे निर्माण होतेय समाजात तेढ

By Admin | Updated: June 23, 2014 22:22 IST2014-06-23T22:22:20+5:302014-06-23T22:22:20+5:30

आधुनिक तत्रज्ञानाचा गैरवापर करुन समाजामध्ये पेढ निर्माण करण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत.

Social media is created due to the lack of social media | सोशल मीडियामुळे निर्माण होतेय समाजात तेढ

सोशल मीडियामुळे निर्माण होतेय समाजात तेढ

>विश्रंतवाडी : आधुनिक तत्रज्ञानाचा गैरवापर करुन समाजामध्ये पेढ निर्माण करण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत. सोशल मिडीयाचा वापर करुन अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा भंग करण्यामुळे समाजात अशांतता पसरत आहे. केंद्र व राज्यसरकार याबाबत गांभिर्याने विचार करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणो  पालिकेच्यावतीने सुमारे 6 कोटी रुपये खचरुन विश्रंतवाडीच्या मुख्य चौकात साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक पादचारी पुलाचे (स्कायवॉक) उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडु गायकवाड, आमदार बापुसाहेब पठारे, स्थायी समिती अध्यक्ष बापुराव कण्रे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, नगरसेवक सतिश म्हस्के, सुनिल गोगले, किशोर विटकर, महेंद्र पठारे, नगरसेविका सुनिता साळुंके, अॅड.नानासाहेब नलावडे आदीं उपस्थित होते. 
उपमुख्यमंत्री म्हणाले की, विश्रंतवाडीच्या चौकात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्कायवॉकमुळे पादचारी नागरिकांची मोठी सोय झाली आहे. या स्कायवॉकला तिन्ही बाजुंनी असलेल्या लीफ्टमुळे ज्येष्ठ नागरिकांना पाय:या चढण्याची कसरत टळली आहे. पुणो शहरात अशा प्रकारे इतरही ठिकाणी स्कायवॉक होणो जरुरीचे आहे. हा स्कायवॉक केल्याबद्दल आपण पालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभार मानतो.  विश्रंतवाडीतील स्कायवॉक पूर्ण होऊन अनेक महिने उलटल्यानंतरही केवळ उद्घाटनाअभावी हा स्कायवॉक नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. याबाबत लोकमत ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. 
तसेच मनसेचे शहरसंघटक 
मोहन ¨शदे-सरकार यांनीही 
याबाबत अधिका:यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. 
या पाश्र्वभूमीवर पालिकेच्यावतीने अचानकपणो स्कायवॉकचे 
उद्घाटन करण्यात आले.   

Web Title: Social media is created due to the lack of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.