शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 08:21 IST

Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली.

मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली. मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या घरात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलांची भेट न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देऊन त्यांनी पोलिसांकडे कारवाई करण्याची विनंती केली आहे. करुणा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून माझ्या दोन मुलांना त्यांच्या चित्रकुट बंगल्यात लपून ठेवले आहे. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हाकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाहीत. त्यात १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश असून तिथे महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील. माझ्या विरोधातही ते मुलांना भडकवत आहेत. माझी मुलांसोबत  भेट घालून दिली नाहीतर २० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे. (चित्रकुट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी द्या, मुंडे यांच्यावर कठोर  कारवाई करा, अशी मागणीही करुणा यांनी केली आहे. कोण आहे करुणा शर्मा?मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर  आपली भूमिका मांडताना, करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात.  शर्माची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे नमूद केले होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMumbaiमुंबई