मोबाइलच्या बॉक्समध्ये साबण
By Admin | Updated: November 24, 2014 09:36 IST2014-11-24T03:17:33+5:302014-11-24T09:36:48+5:30
अंबरनाथमध्ये मोबाइलच्या दुकानात एका मोबाइलच्या बॉक्समध्ये चक्क भांडी घासण्याचे साबणे निघाले. या प्रकाराने मोबाइल खरेदीसाठी आलेला

मोबाइलच्या बॉक्समध्ये साबण
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये मोबाइलच्या दुकानात एका मोबाइलच्या बॉक्समध्ये चक्क भांडी घासण्याचे साबणे निघाले. या प्रकाराने मोबाइल खरेदीसाठी आलेला ग्राहक आणि स्वत: दुकानदार चक्रावून गेला. मात्र या प्रकरणाची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसून ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.
‘मैहर’ असे या दुकानाचे नाव असून दुकानाचे मालक हरिओम त्रिपाठी यांनी आपल्या दुकानात सॅमसंग कंपनीचा नोट-२ हा मोबाइल विक्रीसाठी मागविला होता. मात्र, वितरकाकडे हा मोबाइल उपलब्ध नसल्याने त्याने अंबरनाथमधील दुसऱ्या एका दुकानातून मोबाइल घेण्यात सांगितले. वितरकाच्या सांगण्यावरून त्रिपाठी यांनी दुसऱ्या दुकानातून मोबाइल मिळवला. मात्र, काही दिवस हा मोबाइल विकला न गेल्याने त्रिपाठी यांनी तो दुकानात असाच ठेवला होता. २१ नोव्हेंबरला एका ग्राहकाने मोबाइल मागितला असता त्या ग्राहकाच्या समोर मोबाइलचे सील उघडण्यात आले. मात्र, या बॉक्समध्ये कागद आणि कपडे धुण्याचे साबण ठेवले होते. हा प्रकार पाहून त्याने लागेच वितरकाकडे तक्रार केली. मात्र, वितरकाने आपले हात वर केल्यावर दुकानदार पोलीस ठाण्यात गेला. मात्र, तेथेही त्याची तक्रार घेण्यात आली नाही. या प्रकरणी ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा सल्ला या दुकानदाराला देण्यात आला. (प्रतिनिधी)