तर तुमची मोबाईल बॅटरी खराब नाही होणार
By Admin | Updated: March 29, 2017 18:52 IST2017-03-29T18:28:25+5:302017-03-29T18:52:10+5:30
हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो.

तर तुमची मोबाईल बॅटरी खराब नाही होणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला वारंवार बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार नाही. अनेकदा असे होते की, आपण फोन चार्जिंगला लावतो आणि झोपून जातो त्यानंतर सकाळी उठल्यावर फोन चार्जिंग बंद करतो. पण असं करण चुकीचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?. आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होते पण बॅटरी खराब होण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे का? नाही ना? चला तर मग आज आम्ही तुम्हाला नेमकं कारण आणि त्यावर उपाय सांगतो.
आपल्यापैकी अनेकजण हे दोन वर्ष फोन वापरतात आणि त्यानंतर बदलतात. सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोबाईल पूर्णपणे चार्ज असावा यासाठी अनेकजण रात्री फोन चार्जिंगसाठी लावतात आणि सकाळी बंद करतात. पण रात्रभर चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते तसेच फोनही हँग होण्यास सुरुवात होते. म्हणूनही हे दोन वर्षापर्यंतच फोन वापरतात आणि त्यानंतर नवा फोन घेतात.