शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

"...तर वनमंत्री काय कामाचे?", शिंदेंना घेरणाऱ्या गणेश नाईकांवर निलेश राणे तुटून पडले; प्रश्नांचा वाचला पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:17 IST

राज्याचे वन मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. नाईकांनी शिंदेंना घेरताच आमदार निलेश राणे यांनी तक्रारी आणि प्रश्नांचा पाढा वाचत पलटवार केला. 

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्यास सुरूवात केली. नाईक आक्रमक झाल्यानंतर आता शिंदेसेनेकडून पलटवार करण्यास सुरूवात झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईकांना आव्हान दिले. शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनीही नाईकांना त्यांच्या खात्यातील कामांची आठवण करून देत पलटवार केला आहे. 

शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे म्हणाले, "मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो. कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे."

हे वनमंत्र्यांच्या परवानगीने सुरूये का? "अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही. फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत. साधनसामुग्री नाही. DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही. लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय", असा सवाल करत निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या कामावरच शंका उपस्थित केली आहे.     

पुढे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे की, "वन राहिलीच नाहीत, तर वनमंत्री काय कामाचे?  जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले, तसे आता जंगल पोखरले जात आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही, ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत", अशा शब्दात निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश नाईकांवर पलटवार केला. 

श्रीकांत शिंदेंनी नाईकांविरोधात थोपटले दंड

"माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील महापालिकांमध्ये माझ्या शिवसेनेची सत्ता आहे. तुमच्या नवी मुंबई महापालिकेमध्ये आमच्या चुकांमुळे १० नगरसेवक कमी आले आहेत. तुम्ही एक महापालिका घेऊन कसल्या वल्गना करता. एकनाथ शिंदे यांच्या नादाला तुम्ही लागा, मात्र श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका. तुम्हाला खुमखुमी असेल, तर खुले आव्हान देतो. तुम्ही किंवा तुमचा मुलगा ठाणे, कल्याण कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून उभा राहून दाखवा. तुमची खुमखुमी हा श्रीकांत शिंदे पूर्ण करेल", असे आव्हान श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rane attacks Naik over forest issues, questions minister's role.

Web Summary : Nilesh Rane criticizes Forest Minister Ganesh Naik regarding deforestation and lack of resources. He questions Naik's effectiveness and accuses him of prioritizing publicity over addressing critical issues in forest management. Shrikant Shinde also challenged Naik.
टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण