शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

... तर उद्याच चीनमधील 90 भारतीय 'मायदेशी' येतील, पृथ्वीराज बाबांनी करून दाखवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 09:26 IST

लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं.

मुंबई - चीनमध्ये कोरोना वायरसने थैमान घातले असून आत्तापर्यंत 2 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, तेथील अनिवासी नागरिकांना त्यांच्या देशाकडून मायदेशी नेण्यात येत आहे. भारत सरकारनेही चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवले आहे. मात्र, अद्यापही चीनमधील काही महत्वाच्या शहरांमध्ये भारतीय नागरिक फसले असून घरवापसी करण्याची विनंती या भारतीयांकडून होत आहे. त्यातच, मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीसोबत फोनवरुन संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले होते. 

लोकमत डॉट कॉमने www.lokmat.com याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होतं. त्यानंतर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनीशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. तसेच, देशपातळीवर आणि पराराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क करुन चीनमधील भारतीयांचा विश्वास वाढवला. आता, या सर्व भारतीयांसाठी गुडन्यूज आहे. कारण, लवकरच ते मायदेशी परतणार आहेत.  

Video : चीनमध्ये अडकलेल्या अश्विनीला पृथ्वीराज 'बाबांचा' व्हॉट्सअप कॉल

''चीनमधील वुहान शहरात जवळपास 90 भारतीय अडकले आहेत त्यामधील 8 लोक हे महाराष्ट्रीय आहेत. मी त्या 8 ही जणांशी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांशी सुद्धा फोनवरून चर्चा केली. अडकलेल्या भारतीयांना भारतात परत येण्याची इच्छा आहे व तसे भारतीय दुतावासाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. तसेच, चीनमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चीन सरकारकडून उद्या भारतीय वायुदलाचे विमान उतरविण्यास जर परवानगी मिळाली तर भारतीय वायुदलाचे एक विमान उद्या चीनकडे रवाना होईल. आपले सर्व भारतीय सुरक्षितरित्या भारतात परत यावेत, यासाठी मी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त करतो, असेही चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन म्हटले आहे. 

मोदीजी, आम्हालाही 'एअरलिफ्ट' करा; वुहानमध्ये अडकलेल्या मराठमोळ्या तरुणीची साद

दरम्यान, चीनमध्ये अडकलेल्या आणि मूळच्या सातारच्या अश्विनी पाटील यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण व्हॉट्सअप कॉलद्वारे यांनी संपर्क साधून संवाद साधला होता. अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांना आश्वासक धीर देत चीनमधील भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांना मुंबईत आणण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका फोन कॉलने अश्विनीला मोठा धीर मिळाला आहे. विशेष म्हणजे, पर्यायी पासपोर्टचीही व्यवस्था होईल, यादरम्यान कोणतीही अडचण आली तर डायरेक्ट संपर्क साधण्याचही चव्हाण यांनी अश्विनीला दिला होतं. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSatara areaसातारा परिसरcorona virusकोरोनाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय