शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन, भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी! पण..."; संजय राऊतांचा EC ला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:23 IST

संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नव-नवे मुद्दे उपस्थित करत आपापल्या विरोधकांना खिंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता, "कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का?" असा प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला विचारल आहे. एवढेच नाही, तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अॅक्शन व्हायला हवी, असेही राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत? -संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला प्रश्न करायची इच्छा आहे, की कोड ऑफ कंडक्ट केवळ भाजप विरोधकांसाठीच आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सर्व लवा-जमा घेऊन पंतप्रधान म्हणून प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांचे सरकारी स्पेशल फ्लाइट, मग त्याला फोर्स-1 म्हणा, नाही तर फोर्स- 2 म्हणा. सरकारी खर्चाने आणि सरकारी यंत्रेणेसह निवडणूक प्रचार करत आहेत. 

...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन -आता मुंबईत येतील (नरेंद्र मोदी) 10 जनसभा घेतील. जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात तेव्हा, कुणी पंतप्रधान नसतो, कुणी मंत्री नसतो. तो सामान्य नागरिक राहतो, उमेदवार राहतो. त्यांचा आणि सरकारी यंत्रणेवर होणारा खर्च पक्षाच्या (भाजप) खात्यावर जायला हवा. जर असे झाले नाही, तर हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी. मात्र असे होणार नाही. नोटीस जाईल, काँग्रेसला, शिवसेनेला, तृणमूल काँग्रेसला, पण नरेंद्र मोदींना जाणार नाही. ही देशाची लोकशाही आहे.

मुंबई करांनी आपल्याला मते का द्यावीत? ज्या पद्धतीने आपण धारावी अदानींना विकली, ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला. "आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही," असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४