शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'...म्हणून 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करावी लागली', परिवहन मंत्री सरनाईकांनी सांगितले कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:03 IST

ST Ticket Price Hike News: राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. यामागील कारणांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. 

ST Bus Fare hike: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागला आहे. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के इतकी वाढ करण्यात आली असून, शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्रीपासून लागू होणार आहे. पण, इतकी मोठी भाडेवाड राज्य सरकारला का करावी लागली, याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "काल (२३ जानेवारी) प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव या तिघांच्या समितीची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, एसटीची भाडेवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ती १४.९७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे."

'प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित, पण...', सरनाईकांनी दिली माहिती

"रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, ती ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत चालले आहेत. प्रत्येक वर्षी खरंतर ही भाडेवाढ अपेक्षित असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून ही करण्यात आलेली नसल्या कारणाने ही एकत्रित १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ती आजपासून लागू होईल", अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

"एसटी महामंडळाची परिस्थिती आज काही चांगली नाहीये. एसटीचे उत्पन्न आहे, त्यापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे दिवसाला तीन कोटी रुपयांचं नुकसान एसटी महामंडळाला होतं. त्यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना सुविधा द्यायच्या असतील, तर या गोष्टीची गरज असणार आहे. कारण दिवसेंदिवस डिझेल, सीएनजी आणि बसची दुरूस्तीचा खर्च वाढू लागला आहे", असेही सरनाईक म्हणाले. 

मी बैठकीत दरवर्षी भाडेवाढीचं सूचना केली होती -सरनाईक

'मी जेव्हा परिवहन खात्याची बैठक घेतली. त्यावेळी हेच सूचवलं होतं की, एकत्रितपणे भाडेवाढ करण्याऐवजी जर दरवर्षाला ठराविक भाडेवाढ केली, तर सर्वसामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही. प्रवाशांनाही ते अपेक्षित असेल. आता केलेल्या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचं जे दररोज नुकसान होतं आहे, ते कमी होईल", अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.

टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईकMahayutiमहायुतीMumbaiमुंबई