..तर मेट्रो प्रकल्प उखडून टाकू
By Admin | Updated: March 14, 2015 05:45 IST2015-03-14T05:45:53+5:302015-03-14T05:45:53+5:30
मराठी माणूस लढ्याला कधीच घाबरत नाही. राज्यात सरकार आपले असल्याने संघर्षाची वेळ येऊ नये ही इच्छा आहे. मात्र मेट्रो प्रकल्प मराठी

..तर मेट्रो प्रकल्प उखडून टाकू
.मुंबई : मराठी माणूस लढ्याला कधीच घाबरत नाही. राज्यात सरकार आपले असल्याने संघर्षाची वेळ येऊ नये ही इच्छा आहे. मात्र मेट्रो प्रकल्प मराठी माणसांच्याच मुळावर उठणार असेल तर उखडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.
हॉर्निमन सर्कल ते गेटवे आॅफ इंडिया या मार्गावर शिवराय संचलनाचे आयोजन शिवसेनेने केले होते. त्या वेळी ठाकरे बोलत होते. मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता गिरगावमधील मराठी माणसांची वस्ती असलेल्या इमारती पाडण्यात येणार आहेत. त्याला तेथील रहिवाशांचा कडाडून विरोध आहे. त्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी वरील इशारा दिला.
मराठी माणसांच्या घरावरच
नांगर का फिरवता, असे विचारणाऱ्या ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाकरिता मलबार हिलवरील श्रीमंतांची घरे
का पाडत नाही, असा सवाल
केला. तासगावच का? वांद्रे
(पूर्व) बिनविरोध होऊ द्या, केवळ तासगावची पोटनिवडणूकच कशाला? वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही बिनविरोध होऊ द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)