शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला, गृहमंत्री दिलीप वळसेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:11 IST

Home Minister Dilip Walse : ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांच्याशी अराजकीय गप्पा मारल्या. यावेळी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से याबद्दल वळसे-पाटील मोकळेपणाने बोलले.

मुंबई : पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा शरद पवार यांच्याकडे मतदारसंघासाठी महाविद्यालय असावे, अशी मागणी केली होती. मात्र, शरद पवार हसले आणि म्हणाले की, तुझ्या मतदारसंघात महाविद्यालयाची गरज नाही. तर साखर कारखान्याची गरज आहे. त्यामुळे साखर कारखान्यासाठीचा प्रस्ताव घेऊन ये. त्यानंतर आम्ही साखर कारखान्याचा प्रस्ताव दिला आणि शरद पवार यांनी तो मंजूर केला. केवळ आठ महिन्यांत साखर कारखाना उभा केला. शरद पवार यांनी दूरदृष्टीने तो निर्णय घेतला होता. त्याचा आज सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे, अशी आठवण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितली.‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांच्याशी अराजकीय गप्पा मारल्या. यावेळी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से याबद्दल वळसे-पाटील मोकळेपणाने बोलले. पदवी घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी करावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी ते मला शरद पवार यांच्याकडेही घेऊन गेले होते. परंतु, नोकरी करण्यापेक्षा राजकारणात जावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे १९८१ ते १९८८ या कालावधीत शरद पवारांचा स्वीय सचिव म्हणून काम पाहिले. त्यामुळे अनेकांचा सहवास लाभला, ओळखी वाढल्या. घरातूनच राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली, राजकारणात येऊन पद मिळवणे हा हेतू कधीच नव्हता, असं त्यांनी प्रांजळपणे सांगितलं.देवेंद्र फडणवीस हे फोकस असलेले व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना, प्रतिक्रिया देताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहिल्यास त्यांनाच त्याचा जास्त फायदा होईल, असा सल्लाही वळसे-पाटील यांनी दिला.

------

मतदारसंघात डी.एड. कॉलेजची इच्छा त्यावेळी जरी राहिली, तरी डी.एड. नाही, पण बी.एड. कॉलेज मंजूर करून घेतले आणि पुढे उच्च तंत्रशिक्षण मंत्री झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बी.एड., डी.एड. कॉलेजेस मागितली, ती मंजूर करून दिली.- दिलीप वळसे-पाटील 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSharad Pawarशरद पवार