...म्हणून राज ठाकरेंनी नाकारला एअर इंडियाच्या विमानातून प्रवास
By Admin | Updated: May 27, 2017 17:29 IST2017-05-27T17:04:47+5:302017-05-27T17:29:29+5:30
आठवड्याच्या सुरूवातीला राज ठाकरे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार होते त्यावेळी ही घटना घडली.

...म्हणून राज ठाकरेंनी नाकारला एअर इंडियाच्या विमानातून प्रवास
ऑनलाइन लोकमत
मुंबई. दि. 27- एअर इंडिया आणि राजकीय नेते यांच्यामध्ये होणारा वाद काही नविन गोष्ट नाही. शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारल्याचं प्रकरण अजूनही ताज आहे. आता पुन्हा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी राजकीय नेत्याला थांबवल्याचं समोर आलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सिक्युरिटीसह विमान प्रवासाला एअर इंडियाकडून परवानगी नाकारण्यात आली. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला राज ठाकरे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार होते त्यावेळी ही घटना घडली. एअर इंडियाकडून नियमांचा दाखल देत शस्त्र असलेल्या अंगरक्षकांसह विमानाने प्रवास करू शकत नाही असं राज ठाकरे यांना सांगण्यात आलं होतं. मुंबई ते ग्लावियर असा प्रवास राज ठाकरेंना करायचा होता.