डास पळवणारी अगरबत्ती घातकच!

By Admin | Updated: March 30, 2015 02:26 IST2015-03-30T02:26:51+5:302015-03-30T02:26:51+5:30

डास पळवणारी एक अगरबत्ती रात्रभर सुरू राहिल्यास ती १०० सिगारेटचा धूर सोडते, हे सीआरएफ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे

Smuggled incense sticks! | डास पळवणारी अगरबत्ती घातकच!

डास पळवणारी अगरबत्ती घातकच!

सुमेध वाघमारे,  नागपूर
डास पळवणारी एक अगरबत्ती रात्रभर सुरू राहिल्यास ती १०० सिगारेटचा धूर सोडते, हे सीआरएफ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हा धूर ‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’साठी (सीओपीडी) कारणीभूत ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. फुफ्फुसांच्या या व्याधीचे प्रमाण जगभरात वाढत आहे. भारतात सुमारे १५ दशलक्ष व्यक्ती या व्याधीने ग्रस्त आहेत.
सुरुवातीला या आजाराची फारशी लक्षणे दिसून येत नाही. यामुळे बहुसंख्य रुग्ण तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात, परिणामी युरोपच्या तुलनेत भारतात सीओपीडीचे चारपट जास्त मृत्यू होतात. धक्कादायक म्हणजे, यात धूम्रपान न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
सीओपीडीबद्दलचे अज्ञान मृत्यूला कारणीभूत असलेले हे तिसरे मोठे कारण ठरत आहे. तंबाखूचा धूर, बायोमास इंधनाचा धूर, औद्योगिक प्रदूषण, वाफा आणि पर्यावरणीय प्रदूषके या कारणांमुळे ‘सीओपीडी’ हा आजार बळावत आहे.
सीओपीडीची सुरुवातीची लक्षणे न जाणारा कफ, कफाचे बेडके आणि व्यायाम करताना किंवा पायऱ्या चढताना श्वास घेण्यात होणारा त्रास, अशी आहेत. परंतु अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात.
नंतर जेव्हा आजार वाढतो पायऱ्या चढायला, फिरायला जाताना किंवा सकाळच्यावेळी आंघोळ करताना, कपडे घालताना श्वास घेण्यास अडचण जाणवू लागते तेव्हा रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे येतात.
मात्र तोपर्यंत रुग्ण तिसऱ्या टप्प्यात गेलेला असतो. अशा रुग्णांची संख्या ९० टक्के आहे.
या आजाराच्या रुग्णाला फार लवकर मधुमेह, उच्चरक्तदाब, अर्धांगवायू, ओस्टिओपोरीसीस सारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या आजाराचे
निदान जितक्या लवकर होईल, तितक्याच प्रभावीपणे हा उपचार करणे शक्य आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सहा सेकंदांच्या तपासणीतून याचे निदान होते.

Web Title: Smuggled incense sticks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.