नोटाबंदीच्या निर्णयातून आर्थिक घोटाळ्याचा वास - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 18:44 IST2016-12-24T18:42:49+5:302016-12-24T18:44:31+5:30
नोटबंदीच्या निर्णयाला आर्थिक घोटाळ्याचा वास येत असल्याचा स्पष्ट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

नोटाबंदीच्या निर्णयातून आर्थिक घोटाळ्याचा वास - पृथ्वीराज चव्हाण
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - नोटाबंदीचा निर्णय सपशेल अपयशी ठरला असून नोटबंदीच्या निर्णयाला आर्थिक घोटाळ्याचा वास येत असल्याचा स्पष्ट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकच्या जिल्हा कॉँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
शिवस्मारकाचे भूमिपूजन राजकीय लाभ घेण्यासाठी निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली. पुणे-मेट्रोचे उदघाटनदेखील विलंब करुन राजकिय फायद्यासाठी आता केले जात असल्याचे ते म्हणाले.
नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना मदत थांबलेली नाही, काळा पैसाही बाहेर आलेला नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भ्रष्टाचार किंचीतही कमी झाला नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.