शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:12 IST

पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़

- अरुण वाघमोडेअहमदनगर - पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़नगर जिल्हा पोलीस दलाच्या दिलासा सेलकडे वर्षभरात पती-पत्नीच्या वादातून दाखल झालेल्या २२३५ तक्रारींपैकी ९०० जोडप्यांनी स्मार्ट फोन हेच वादाचे कारण असल्याचे नमूद केले आहे़ मोबाइलमुळे काडीमोड झालेल्यांमध्ये नवविवाहित दाम्पत्याचीच संख्या सर्वाधिक आहे़आधी पती, सासू-सासऱ्यांकडून त्रास, हुंड्यासाठी छळ, पतीचेव्यसन, विवाहबाह्य सबंध हे कळीचे मुद्दे असायचे. तेही हल्ली असतात. नाही असे नाही, पण बदलत्या काळात ‘मोबाइल’ आणि सोशल मीडिया’ संसार तुटण्यास कारणीभूत ठरत आहे़दिलासा सेलकडे आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात २२३५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. समुपदेशनातून त्यापैकी ७५४ जोडप्यांचे वाद मिटवण्यात आले, तर ४६६ जणांनी स्वत:हून आपला निर्णय घेण्याचे ठरविले. याखेरीज २१५ प्रकरणे गुन्ह्यांसाठी दखलपात्र ठरली. याशिवाय ८ दाम्पत्यांना दिलासाने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठविले व ७ जोडप्यांनी घटस्फोट घेतला.हीच ‘माझी सवत’पती तासन्तास मोबाइलवर बोलतो, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर व्यग्र असतो. माझ्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवरील मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतात. समजावून सांगितले तर रागावतो. मला व मुलांना वेळ देत नाही. स्वत:चा मोबाइल पाहू देत नाही, पासवर्ड सांगत नाही़ पूर्वीप्रमाणे पे्रम करत नाही, मोबाइल ‘माझी सवत’ आहे, अशा तक्रारी महिलांनी केल्या.तीच असते मोबाइलवरआॅफिसच्या कामासाठी फोनवर बोलावे लागते. व्हॉट्सअ‍ॅप हा व्यवसायाचा भाग आहे़ ती क्षुुल्लक कारणाने कटकट करते़ निष्कारण संशय घेते़ तीच अधिक मोबाइलवर बोलते, ती जुन्या मित्रांच्या संपर्कात आहे. माहेरच्या नातेवाइकांकडे माझी तिने बदनामी केली. घरी असल्याने तिला का हवा स्मार्ट फोन? हिच्यामुळे माझे आयुष्य संपून चालले आहे, अशा पुरुषांच्या तक्रारी आहेत.पती-पत्नींमध्ये मोबाइलमुळे वाद होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे़ मोबाइल हे कारण क्षुल्लक वाटत असले तरी त्यातून सुखी संसार विस्कटलेले दिसतात़- कल्पना चव्हाण,निरीक्षक, दिलासा सेल

टॅग्स :MobileमोबाइलFamilyपरिवार