स्मार्ट सिटीचा संकल्प
By Admin | Updated: September 28, 2015 02:35 IST2015-09-28T02:35:18+5:302015-09-28T02:35:18+5:30
नागपूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी लायन्स क्लबनेही पुढाकार घेतला आहे. अॅड. मनोज साबळे यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब आॅफ नागपूर सिटीची स्थापना क्लबचे प्रांतपाल विजय पालिवाल यांच्या हस्ते

स्मार्ट सिटीचा संकल्प
नागपूर : नागपूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी लायन्स क्लबनेही पुढाकार घेतला आहे. अॅड. मनोज साबळे यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब आॅफ नागपूर सिटीची स्थापना क्लबचे प्रांतपाल विजय पालिवाल यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. स्मार्ट सिटीसाठी क्लबच्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात चार्टर अध्यक्ष म्हणून अॅड. मनोज साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष गोविंद निंबाळकर, डॉ. पुरुषोत्तम येनुरकर, सचिव म्हणून सतीश बैस, सहसचिव प्रवीण डांगे, कोषाध्यक्ष शिवकुमार मोहर, सहकोषाध्यक्ष वासु ठाकरे, पीआओ प्रफुल्ल इटकेलवार, क्लब बुलेटिन एडिटर प्रा. आनंद मांजरखेडे, अरुण झाडे, गणेश तोमड तसेच संचालक म्हणून राजेंद्र मिश्रा, बेलेकर, प्रशांत पवार, पुरुषोत्तम उपासे, नितीन अरसपुरे, श्रीकांत पवनीकर, अमोल खरतड यांना प्रथम प्रांतपाल राजे मुधोजी भोसले यांनी शपथ दिली. क्लबच्या सर्व सदस्यांना द्वितीय प्रांतपाल प्रतिभा अदलखिया यांनी शपथ दिली. याप्रसंगी विवेक चिब, प्रकाश हेडा, सूर्यकांत अग्रवाल, नंदकिशोर काबरा, महेश बुब, सुधीर बाहेती, अजय मल, ललित माहेश्वरी, चंद्रकांत सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)