शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

छाेटे राजकीय पक्ष रडारवर; ११० ठिकाणी ‘आयकर’चे छापे; पैशांची अफरातफर, देणग्यांचा हिशेब नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 06:30 IST

विविध क्षेत्रांतील धोरणांचा अभ्यास करीत त्यावर तज्ज्ञांतर्फे अभ्यास अहवाल करणाऱ्या दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेवरही छापेमारी झाली. 

मुंबई : कोट्यवधींच्या देणग्या घेणाऱ्या मात्र त्यांचा कोणताही हिशेब न दिलेल्या, बोगस पावत्यांद्वारे पैशांची अफरातफर केलेल्या आणि करातून अवैधरीत्या सूट मिळविल्याप्रकरणी देशातील सुमारे ८७ लहान राजकीय पक्षांवर आयकर विभागाने बुधवारी छापेमारी केली. देशात एकूण ११० ठिकाणी झालेल्या छापेमारीमध्ये आयकर विभागाचे ३०० हून अधिक अधिकारी सहभागी होते. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांतून प्रामुख्याने ही कारवाई झाली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. राजकीय पक्ष म्हणून नोंदणी असलेल्या मात्र मान्यता नसलेल्या अशा पक्षांवर ही कारवाई झालेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, वार्षिक जमा-खर्चाचा ताळेबंद सादर करणे राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. मात्र, ज्या राजकीय पक्षांनी हा ताळेबंद सादर केलेला नाही आणि ज्यांचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत, अशा तब्बल २१०० पक्षांवर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या पडताळणीमध्ये काही पक्ष केवळ कागदावरच असल्याचे दिसून आले; मात्र त्यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाल असल्याचे दिसून आले. या संदर्भात या पक्षाच्या प्रमुखांना जेव्हा निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी बोलावले तेव्हा ते  गैरहजर  राहिले होते. 

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेवरही छापे -विविध क्षेत्रांतील धोरणांचा अभ्यास करीत त्यावर तज्ज्ञांतर्फे अभ्यास अहवाल करणाऱ्या दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेवरही छापेमारी झाली. 

ही संस्था नॉन-प्रॉफिट सेवा म्हणून नोंदणीकृत असून, त्याला कर सवलत आहे. तसेच, संस्थेचा सर्व आर्थिक ताळेबंद वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे या कारवाईबाबत संस्थेने आश्चर्य व्यक्त केले आहे. 

राजस्थानमधील गृहमंत्र्यांवरही छापेमारीछापेमारीमध्ये राजस्थानचे गृहमंत्री व शिक्षणमंत्री राजेंद्र यादव यांच्या घर, त्यांच्या नातेवाइकांच्या कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी केली. विद्यार्थ्यांना दिलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत घोटाळा झाल्याच्या आरोपावरून छापेमारी केली आहे.

८७ पक्षांची मान्यता आयोगाकडून रद्द अशा एकूण ८७ राजकीय पक्षांची मान्यता आयोगाने रद्द करून यांच्या आर्थिक उलाढालींची चौकशी करण्याची शिफारस मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला केली होती. या शिफारशींच्या अनुषंगानेच ही कारवाई झाली आहे. 

राजकीय पक्षांनी काय घोटाळा केला? -लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम २९ (सी) नुसार, दरवर्षी राजकीय पक्षांना त्यांना मिळालेल्या देणग्यांची माहिती फॉर्म-२४ द्वारे भरून निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. हा फॉर्म भरल्यानंतरच या राजकीय पक्षांना कर सवलत मिळते. लोकशाहीच्या समृद्धीसाठी हा पैसा खर्च करण्यात येणार असल्याचे मानत ही कर सवलत जारी करण्यात येते. 

सुमारे ४१८ राजकीय पक्षांनी या निकषाची पूर्तता केलेली नाही. तसेच, देणग्यांपोटी १९९ राजकीय पक्षांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ४४५ कोटी रुपयांची कर सवलत प्राप्त केली, तर २०१९-२० या आर्थिक वर्षात २१९ राजकीय पक्षांनी ६०८ कोटी रुपयांची कर सवलत प्राप्त केली. 

निकषांचे पालन न करता मिळविलेली ही कर सवलत अवैध असून, त्यामुळेच ही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या खेरीज, निवडणूक आयोगाने केलेल्या पडताळणीमध्ये ८७ राजकीय पक्षांनी बोगस पावतीपुस्तक छापत त्याद्वारे पैसे जमा केले. तसेच, पैशांचा कोणताही हिशेबही दिलेला नाही. या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयraidधाड