शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 06:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या लहान घटकपक्षांना आगामी विधानसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या लहान घटकपक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत ४०च्या आसपास जागा हव्या आहेत. यात डाव्या पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षाचा समावेश आहे. 

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना बुधवारी ‘मविआ’च्या प्रमुख नेत्यांनी डाव्या पक्ष आणि समाजवादी पक्षासोबत चर्चा केली. शेकापचे नेते जयंत पाटील मुंबईबाहेर असल्याने या बैठकीला नव्हते. ते उद्या मविआच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. घटकपक्षांकडून आलेल्या प्रस्तावावर येत्या ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा होणार आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ११, समाजवादी पक्षाने १२, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष आणि इतर लहान-मोठे पक्ष, संघटनांनी मिळून जवळपास ४०च्या आसपास जागा ‘मविआ’कडे मागितल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत लहान घटकपक्षांमुळे जिथे ‘मविआ’ला यश मिळाले त्या जागा मिळाव्यात आणि जागावाटप सन्मानजनक व्हावे, अशी या घटकपक्षांची भूमिका आहे.

‘मविआ’सोबतची चर्चा सकारात्मक झाली. चर्चेतून मार्ग निघेल. ही निवडणूकपूर्व आघाडी आहे. आम्ही दिलेल्या प्रस्तावावर ‘मविआ’चे नेते विचार करतील, अशी अपेक्षा आहे. - उदय नारकर, राज्य सचिव, माकप 

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडीसोबत जागावाटपावरून चर्चा बिनसल्यामुळे सपाला ३ जागाच लढवता आल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत ‘मविआ’सोबत जाण्याची इच्छा असून, १२ जागा‘मविआ’ने सपासाठी सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. - अबू आझमी, नेते, समाजवादी पार्टी  

कुणी कोणत्यामागितल्या जागा nसपा : भायखळा, वर्सोवा, अणुशक्तीनगर, मानखुर्द, भिवंडी पूर्व आणि पश्चिम, मालेगाव मध्य, धुळे शहर, औरंगाबाद मध्य nमाकप : डहाणू, कळवण, सोलापूर मध्य, नाशिक पश्चिम, अकोले, किनवट, माजलगाव, पाथरी, दिंडोरी, इगतपुरी, विक्रमगड, शहापूरnभाकप : वणी, हिंगणा, शेवगाव पाथर्डी, शिरपूर, औरंगाबाद मध्य, दारव्हा, भिवंडी पूर्व, शहापूर, सायन कोळीवाडा, नाशिक, भंडारा.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४