मुंबईतील कुर्ल्यात झोपडपट्ट्यांना आग
By Admin | Updated: January 7, 2017 08:08 IST2017-01-07T08:08:15+5:302017-01-07T08:08:15+5:30
कुर्ला येथील कपाडियानगरजवळ सात ते आठ झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आहे

मुंबईतील कुर्ल्यात झोपडपट्ट्यांना आग
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - कुर्ला येथील कपाडियानगरजवळ झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आहे. सात ते आठ झोपडपट्ट्यांना ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग वाढत चालली असून नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.