मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावर संथगतीने वाहतूक सुरु
By Admin | Updated: August 30, 2016 10:19 IST2016-08-30T09:10:41+5:302016-08-30T10:19:01+5:30
पाडळी स्टेशनजवळ बिघाड झालेले गोरखपूर एक्सप्रेसचे इंजिन रुळावरुन हटवण्यात आले आहे.

मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावर संथगतीने वाहतूक सुरु
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ३० - पाडळी स्टेशनजवळ बिघाड झालेले गोरखपूर एक्सप्रेसचे इंजिन रुळावरुन हटवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरुन वाहतूक सुरु झाली आहे. मात्र ही वाहतूक संथगतीने सुरु आहे. मुंबईच्या दिशेने येणा-या पंचवटी एक्सप्रेससह अनेक ट्रेन रखडल्या होत्या.. राज्यराणी एक्सप्रेस नाशिक स्थानकात अडकून पडली होती. गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
सकाळी पाचच्या सुमारा गोरखपूर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. चार-पाच तासांपासून नाशिकहून-मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले.
गोदावरी एक्स्प्रेस रद्द, पर्यायी भुवनेश्वर एक्सप्रेसला गोदावरीचे थांबे
मनमाड येथून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. गाडी नं 2880 भुवनेश्वर एक्सप्रेसला गोदावरीचे थांबे देऊन चाकरमान्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याचे स्टेशन प्रबंधक नरेश बडगुजर यांनी सांगितले.