भरदिवसा महामार्गावरील वृक्षाची कत्तल
By Admin | Updated: July 20, 2016 15:32 IST2016-07-20T15:32:32+5:302016-07-20T15:32:32+5:30
१ ते ७ जुलै दरम्यान महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला . त्या अनुषंगाने जनमानसात वृक्षलागवडीबद्दल जनजागृती होणे तसेच त्यांना प्रेरणा मिळावी

भरदिवसा महामार्गावरील वृक्षाची कत्तल
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 20 - १ ते ७ जुलै दरम्यान महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला . त्या अनुषंगाने जनमानसात वृक्षलागवडीबद्दल जनजागृती होणे तसेच त्यांना प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून वृक्ष दिंडी काढल्यात. अख्खे प्रशासनाने पुढाकार घेतला, पण भरदिवसा अकोला महामार्गावर होत असलेल्या वृक्षाची कत्तल होत असतांना याची कोणालाही कल्पना नसल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. एका सुज्ञ नागरिकाने सामाजिक वनिकरण विभाग, वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तेव्हा हे कार्यक्षेत्र आमच्याकडे येत नाही असे सांगून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट दाखविले.
२० जुलै रोजी अतिशय रहदारीचा असलेला वाशिम - अकोला महामार्गावरील वृक्षाची कत्तल होतांना एका सुज्ञ नागरिकाने याबाबत सामाजिक वनीकरण विभागाच्या राठोड, वनविभागाचे वनअधिकारी नांदुरकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.व्ही.चेके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष असून ते आमच्या अखत्यारितील विषय नसल्याचे सांगितले. परंतु वृक्ष वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. या घटनेवरुन शासनाच्यावतिने दोन कोटी वृक्ष लागवडीचा केलेला संकल्पानुसार लावण्यात येत असलेले वृक्ष टिकून राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.