रिक्षातील ‘त्या’ मारेकऱ्याचे स्केच जारी

By Admin | Updated: June 10, 2017 03:02 IST2017-06-10T03:02:33+5:302017-06-10T03:02:33+5:30

कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच २३वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्याचे रेखाचित्र (स्केच) नौपाडा पोलिसांनी जारी केले आहे.

The sketch of the 'kill' of the rickshaw | रिक्षातील ‘त्या’ मारेकऱ्याचे स्केच जारी

रिक्षातील ‘त्या’ मारेकऱ्याचे स्केच जारी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच २३वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्याचे रेखाचित्र (स्केच) नौपाडा पोलिसांनी जारी केले आहे. त्याआधारे त्याचा शोध घेण्यात येत असून, आतापर्यंत या रेखाचित्राशी मिळत्याजुळत्या ४५० रिक्षाचालकांच्या छायाचित्रांची पडताळणी करण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवशीही त्या दोघांचा शोध सुरू असल्याचे नौपाड्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. तसेच तीनहातनाका ते टीसीएस कंपनीपर्यंतचे सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात येत आहे. त्यासाठी तीन वेगवेगळी पथके तयार केली आहेत.
यासंदर्भातील कोणतीही माहिती असल्यास रिक्षाचालक तसेच त्यांच्या संघटनांनी माहिती देण्यास पुढे येण्याचे आवाहन नौपाडा पोलिसांनी केले आहे. आतापर्यंत १५०० रिक्षाचालकांकडे यासंदर्भात चौकशी केली आहे.
दरम्यान, या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Web Title: The sketch of the 'kill' of the rickshaw