स्केटिंगचा २७ तासांचा विक्रम
By Admin | Updated: December 12, 2014 00:38 IST2014-12-12T00:13:30+5:302014-12-12T00:38:18+5:30
बापूजी साळुंखे स्कूलचे खेळाडू : इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड व आशिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली नोंद

स्केटिंगचा २७ तासांचा विक्रम
कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग रिंगवर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूलच्यावतीने सलग २७ तास स्केटिंग करण्याच्या नवा विक्रम आज, गुरुवारी सकाळी पावणेबारा वाजता नोंदवला. या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ व ‘आशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये घेतली. या उपक्रमात ५२ खेळाडूंनी सहभाग घेतला.
सलग २४ तास स्केटिंग करण्याचा यापूर्वीचा विक्रम बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी जून २०१४ मध्ये इंडिया बुक व आशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदवला होता. हा २४ तासांचा विक्रम आज बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूलच्या ५२ खेळाडूंनी मोडला. काल, बुधवारी सकाळी पावणेआठ वाजता या उपक्रमास सुरुवात केली, तर आज सकाळी पावणेबारा वाजता २७ तास स्केटिंग करत पूर्ण झाल्यानंतर बेळगाव येथे स्थापण्यात आलेला विक्रम मोडल्याची घोषणा इंडिया बुक व आशिया बुक आॅफ रेकॉर्डचे अॅडजेडीक्युटर मनमोहन रावत यांनी जाहीर केला. हा विक्रम नोंदवण्यासाठी अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे सहकार्य लाभले.
विक्रमाची नोंद झाल्यानंतर प्राचार्य अभयकुमार साळुंखे, अॅड. धनंजय पठाडे, पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांच्या हस्ते सहभागी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी प्रशिक्षक महेश कदम, रामचंद्र पाटील, पालक उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू असे -
प्रतीक पाटील, शुभम पाटील, श्रृती माने, किरण हराळे, अमेय पाटील, सोहम काटकर, आर्या ढवळे, आयुष उबराणी, मेधा भिलवडे, सिद्धेश देवळेकर, धुर्वी मेहता, अभिराम अकेला, इशा देसाई, सुजल पाटील, अनिकेत मेंगाणे, शुभम मोहिते, सर्वेश भिके, आयुष बिडकर, सुयश माने, ओम जगताप, प्रेरणा भोसले, श्रेयश कागले, शिवानी परीट, शिवम परीट, ऐश्वर्या बिरजे, हर्षवर्धन सूर्यवंशी, चंदन चव्हाण, चंद्रप्रभू मोळेकर, धनश्री कदम, श्रृती आणवेकर, तेजस्विनी कदम, मोरेश्वर कदम, विजया पाटील, अभिजित पाटील, ओंकार मोहिते, आकांक्षा मगर, शिवानी प्रभावळे, श्रेयश कागले, हृषिकेश आडके, सोमनशा: शिपुगडे, खुशी संघवी, अली रिकबदार, इरा वेंगुर्लेकर, अक्षरा खाबिया, तवीश दलाल, खुशी पाटील, वीरश्री कदम, सार्थक वणकुद्रे, सोहम काकडे, वर्धन ढवळे, वेदांत उबाळे, दीप जोसेफ, वर्धन देसाई.
कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूलच्या खेळाडूंनी सलग २७ तास स्केटिंग करण्याचा नवा विक्रम केला. इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड व आशिया बुक आॅफ रेकॉर्डच्यावतीने यामध्ये सहभागी खेळाडूंना सन्मानपदक व प्रमाणपत्र बहाल केले. यावेळी बुकचे मनमोहन रावत, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, अॅड. धनंजय पठाडे, राजाराम शिपुगडे, महेश कदम, रामचंद्र पाटील, आदी उपस्थित होते.