आरटीई प्रवेशाची सहावी विशेष फेरी
By Admin | Updated: June 10, 2017 03:11 IST2017-06-10T03:11:26+5:302017-06-10T03:11:26+5:30
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यासाठी

आरटीई प्रवेशाची सहावी विशेष फेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यासाठी १५ जूनला विशेष सोडत काढली जाणार आहे. या सोडतीसाठी २५ टक्के राखीव असलेल्या जागांवर ११ ते १४ जूनदरम्यान अर्ज सादर करण्याचे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.
याआधी महापालिका क्षेत्रातील ७ हजार ४४९ जागांसाठी आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी तब्बल ९ हजार ४२६ प्रवेश अर्ज आले होते. मात्र आरटीईच्या तब्बल पाच फेऱ्या झाल्यानंतरही २ हजार ७९८ जागांवरच प्रवेश निश्चित झाले, तर ४ हजार ६५१ जागा रिक्त राहिल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अर्ज करूनही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांमधील २ हजार ७१४ विद्यार्थी प्रवेश मिळूनही शाळांकडे फिरकले नाहीत.