हागणदारी मुक्त शहर अभियानात लोणावळा महाराष्ट्रात सहावा
By Admin | Updated: October 13, 2016 18:52 IST2016-10-13T18:52:41+5:302016-10-13T18:52:41+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त शहर अभियानात लोणावळा नगरपरिषदेने सहावा क्रमांक मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई

हागणदारी मुक्त शहर अभियानात लोणावळा महाराष्ट्रात सहावा
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १३ - महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त शहर अभियानात लोणावळा नगरपरिषदेने सहावा क्रमांक मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमित गवळी, तत्कालिन मुख्याधिकारी गणेश शेटे व विद्यमान मुख्याधिकारी सचिन पवार यांना पुरस्कृत करण्यात आले.
मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व हागणदारी मुक्त शहर ही संकल्पना राबवत नगरपरिषदांना त्यामध्ये समाविष्ट केले होते. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमित गवळी व मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरात स्वच्छ भारत अभियान व हागणदारी मुक्त शहर ही संकल्पना प्रभावीपणे राबवत प्रभाग स्वच्छता व गुड माँर्निंग पथकाद्वारे जनजागृती केली, नागरिकांनी देखिल त्याला चांगला प्रतिसाद दिला तसेच स्लम भागामध्ये नव्याने शौचालयांची उभारणी करत प्रभावीपणे दोन्ही संकल्पना राबविल्या होत्या. शासनाच्या पथकाने या सर्व उपक्रमांची पाहणी त्यावेळी केली होती. महाराष्ट्रातील ३२ नगरपरिषदांना यामध्ये उत्कृष्ट म्हणून नामांकणे देण्यात आली होती. त्यामध्ये लोणावळा शहराला ६ वा क्रमांक देण्यात आला असून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल नगरपरिषदेचे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना गौरविण्यात आले.