मुरुड समुद्रकिनारी मुंबईचे सहा पर्यटक बुडाले
By Admin | Updated: July 6, 2014 16:48 IST2014-07-06T16:48:39+5:302014-07-06T16:48:51+5:30
अलिबाग येथील मुरुड समुद्रकिनारी मुंबईतील सहा पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. स्थानिकांनी समुद्रात न उतरण्याचा इशारा देऊनही हे सर्व जण समुद्रात उतरले होते.

मुरुड समुद्रकिनारी मुंबईचे सहा पर्यटक बुडाले
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ६ - अलिबाग येथील मुरुड समुद्रकिनारी मुंबईतील सहा पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. स्थानिकांनी समुद्रात न उतरण्याचा इशारा देऊनही हे सर्व जण समुद्रात उतरले होते अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अलिबाग येथे समुद्रात भरती असल्याने समुद्रात जाऊ नये असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला होता. रविवारी मुरुड समुद्रात मुंबईहून आलेले १५ पर्यटक पोहोण्यासाठी उतरले होते. स्थानिकांनी या सर्वांना पाण्यात न उतरण्याचा इशाराही दिला. मात्र याकडे दुर्लक्ष करुन हे सर्व जण पाण्यात उतरले. समुद्राच्या लाटांसमोर हे पर्यटक तग धरु शकले नाही व सहा जण पाण्यात बुडाले. या अथक प्रयत्नांनतर या सर्वांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दिनेश पवार, दिलीप गोळे, संजय पांचाळ, शंकर चव्हाण, विनोद अलय आणि रोहित झाला अशी या मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे ४० वर्षांवरील असल्याचे समजते.