शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

एसटीच्या सहा हजार गाड्या होणार सेवेतून बाद, १५ लाख प्रवाशांना मोठा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 09:05 IST

ST Bus : महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार गाड्या आहेत. यातून रोज जवळपास ६० लाख प्रवाशांची वाहतूक होते. आयुर्मान संपल्याने ३ हजार गाड्याथेट रिटायर कराव्या लागणार आहेत, तर २ हजार गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत.

 - प्रसाद कानडे 

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेतून जवळपास ६ हजार  गाड्या बाद होणार आहेत. एसटी प्रशासन भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेणार असले तरी ही संख्याही तोकडी पडणार आहे. याचा थेट फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या जवळपास १० ते १५ लाख  प्रवाशांना बसणार आहे. 

महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार गाड्या आहेत. यातून रोज जवळपास ६० लाख प्रवाशांची वाहतूक होते. आयुर्मान संपल्याने ३ हजार गाड्याथेट रिटायर कराव्या लागणार आहेत, तर २ हजार गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. एक हजार गाड्या तांत्रिक कारणासाठी डेपो व कार्यशाळेत असतात. या गाड्या सेवेत नसतील तर रोज १० ते १५ लाख प्रवाशांची गैरसोय होईल. 

एसटीचा संचित तोटा ९ हजार कोटींच्या घरात गेल्याने नव्या गाड्यांसाठी पैसा नाही. एसटी स्वतःचे पेट्रोल पंप सुरू करणार आहे. भाडेतत्त्वावरील गाड्यांना या पंपांवरून डिझेल खरेदी अनिवार्य असेल. सध्या बसला किलोमीटरमागे ४४ रुपये खर्च येतो. भाडेतत्त्वावरील गाड्यांना २५ ते ३० रुपये खर्च आल्याने किलोमीटरमागे १४ रुपये बचत होईल. त्यामुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रमुख मार्गांवरच ह्या गाड्या धावतील.

आयुर्मान संपलेल्या गाड्या प्रवासी सेवेतून बाद होणार आहेत. पण, आम्ही टप्प्याटप्पाने याची अंमलबजावणी करू. प्रवाशांची गैरसोय होऊ देणार नाही.         - डॉ. शेखर चन्ने, व्यवस्थापकीय     संचालक तथा उपाध्यक्ष

टॅग्स :state transportएसटी