नगरमध्ये सहा खंडणीखोर गजाआड
By Admin | Updated: January 26, 2015 04:12 IST2015-01-26T04:12:54+5:302015-01-26T04:12:54+5:30
फेसबुकच्या बनावट खात्यावरून संवाद साधून मैत्री करीत एक कोटी रुपयांसाठी एका व्यापाऱ्याचे पुण्यातून अपहरण करण्यात आले होते.

नगरमध्ये सहा खंडणीखोर गजाआड
अहमदनगर : फेसबुकच्या बनावट खात्यावरून संवाद साधून मैत्री करीत एक कोटी रुपयांसाठी एका व्यापाऱ्याचे पुण्यातून अपहरण करण्यात आले होते. अपहरण झालेला व्यापारी नगरमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने पुणे पोलिसांनी कोतवाली पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री दोन महिलांसह सहा जणांना गजाआड केले. यातील एक आरोपी पळून गेला.
एका मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडून पुणे येथील मोबाईल विक्री करणारे व्यापारी घनश्याम सुरतोलाल मूलचंदानी ( वय ४२, रा. पिंपरी, पुणे) यांच्याशी काहीजणांनी मैत्री केली. पूजा शिंदे नामक या बनावट मैत्रिणीशी भेटण्यासाठी मूलचंदानी २३ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घराबाहेर पडले ते परत आलेच नाहीत. ते बेपत्ता झाल्याची तक्रार पुणे पोलिसात दाखल झाली होती. (प्रतिनिधी)