वाटाघाटीच्या सहा बैठका झाल्या निष्फळ
By Admin | Updated: March 21, 2017 03:58 IST2017-03-21T03:58:28+5:302017-03-21T03:58:28+5:30
एसटी कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करा, १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा इत्यादी मागण्यांवर मान्यताप्राप्त

वाटाघाटीच्या सहा बैठका झाल्या निष्फळ
मुंबई : एसटी कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करा, १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ लागू करा इत्यादी मागण्यांवर मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेबरोबर एसटी महामंडळाच्या सहा बैठका झाल्या. मात्र यात आर्थिक मागण्यांवर निर्णय झाले नसून त्याविरोधात २२ मार्च रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले जाईल, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. याबाबत संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे म्हणाले की, सातवा वेतन आयोग आणि अंतरिम वाढीबाबत महामंडळ उदासिनच असल्याने आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)