देशी कट्टय़ासह सहा जीवंत काडतुसे जप्त
By Admin | Updated: July 1, 2015 01:44 IST2015-07-01T01:44:07+5:302015-07-01T01:44:07+5:30
मलकापूर येथील घटना ; तीन आरोपींना अटक.

देशी कट्टय़ासह सहा जीवंत काडतुसे जप्त
मलकापूर (जि. बुलडाणा) : बुलडाणा स्थानिक गुन्हा शाखा पथकाने तीन दुकाचीस्वार युवकांकडून देशी बनावटी पिस्तुल व सहा जीवंत काडतुस जप्त करून त्या तिघांना ताब्यात घेतल्याची घेतले. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर घडली. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन स्थागुशाच्या पथकाने मंगळवारी मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर सापळा रचुन एमएच १९ बीडी २३५७ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन जाणार्या मलकापूर येथील मनोजसिंग सिकंदरसिंग टाक (वय २२), अनिलसिंग अजितसिंग भोंड (वय २३) आणि लकीसिंग उर्फ झेलसिंग जीवनसिंग जुन्नी (वय २0) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळुन पोलीसांनी एक काळसर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तुल किंमत १५ हजार रुपये, ६ जिवंत काडतूस जप्त के ले.