बस-रिक्षा अपघातात सहा मजूर ठार
By Admin | Updated: April 30, 2016 05:00 IST2016-04-30T05:00:27+5:302016-04-30T05:00:27+5:30
परभणी जिल्ह्यातील मजूर कुटुंबियांच्या रिक्षाला एका खासगी बस जोरदार धडक दिल्याने रिक्षातील सहा जण जागीच ठार झाले.

बस-रिक्षा अपघातात सहा मजूर ठार
बीड/परभणी : दुष्काळी स्थितीमुळे रोजगाराच्या शोधात पुण्याकडे निघालेल्या परभणी जिल्ह्यातील मजूर कुटुंबियांच्या रिक्षाला एका खासगी बस जोरदार धडक दिल्याने रिक्षातील सहा जण जागीच ठार झाले. मृतांत एक महिला व दोन मुलांचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे बीड- अहमदनगर राज्य रस्त्यावर आष्टी तालुक्यातील पोखरीजवळ झाला. दोन गंभीर जखमींवर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. बंडू जोगदंड (३०), केशर जोगदंड (२७), अरुण गायकवाड (३५), निर्र्मलागायकवाड (६), राजू खलसे (२८), आदित्य खलसे (६) अशी मृतांची नावे आहेत. तेजस अरुण गायकवाड व मनीषा राजू खलसे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील बंडू जोगदंड हे कुटुंबियांसह सहा आसनी रिक्षेने पुण्याला निघाले होते. गंगाखेडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्स बसने समोरून जोरदार धडक दिली.