बीडमध्ये अपघातात सहा ठार
By Admin | Updated: October 31, 2015 02:11 IST2015-10-31T02:11:32+5:302015-10-31T02:11:32+5:30
पुणे येथून प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसवर समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर आदळल्याने बसमधील सहा जण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले.

बीडमध्ये अपघातात सहा ठार
अंबाजोगाइ (जि. बीड) : पुणे येथून प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसवर समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर आदळल्याने बसमधील सहा जण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले.
जखमींवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास अंबाजोगाई-बीड रस्त्यावर डिघोळअंबा पाटीजवळ हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला.
अपघातात रोहन बालकिशन हारे (२१, अंबाजोगाई), श्रीनिवास दिगांबर कुलकर्णी (४३, अंबाजोगाई), काशीनाथ संभाजी देवकते (६५), मुक्ताबाई काशीनाथ देवकते (६०, लातूर), धिरज बालाजी दर्शने ( २०, लातूर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. बसचालकासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहक व चालकाने तत्काळ १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेला फोन करून अपघाताची माहिती दिली. रुग्णवाहिका आल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)