सातारा येथे कंटेनरच्या धडकेत सहा ठार

By Admin | Updated: November 16, 2014 12:57 IST2014-11-16T12:57:08+5:302014-11-16T12:57:08+5:30

सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा येथे भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

Six killed in a container in Satara | सातारा येथे कंटेनरच्या धडकेत सहा ठार

सातारा येथे कंटेनरच्या धडकेत सहा ठार

ऑनलाइन लोकमत 

सातारा, दि. १६ - सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा येथे भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात आणखी चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पारगाव खंडाळा येथील एसटी स्टँडवर काही प्रवासी एसटी बसची वाट बघत होते. या दरम्यान भरधाव वेगात असलेल्या चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले व हा कंटेनर बसची वाट बघणा-या प्रवाशांवर जाऊन उलटला.  यात सुमारे दहा प्रवासी कंटेनरखाली चिरडले गेले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरु झाले आहे. 

Web Title: Six killed in a container in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.