मालेगावजवळ अपघातात सहा ठार, आठ जखमी
By Admin | Updated: May 23, 2016 21:59 IST2016-05-23T21:59:38+5:302016-05-23T21:59:38+5:30
सटाण्याकडे जाणाऱ्या इंडिका कारने ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून भरधाव येणाऱ्या अॅपे रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा हवेत पाच फूट उंच उडून फेकली गेल्याने तिचे तुकडे तुकडे झाले

मालेगावजवळ अपघातात सहा ठार, आठ जखमी
ऑनलाइन लोकमत
मालेगाव , दि. २३ : इंडिका व अॅपे रिक्षा यांच्यात अपघात होऊन दोन बालकांसह सहाजण ठार, तर आठ जण जखमी झाले. सटाणा-मालेगाव रस्त्यावर दाभाडी शिवारातील रोकडोबा मंदिर फाट्याजवळ दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सटाण्याकडे जाणाऱ्या इंडिका कारने ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून भरधाव येणाऱ्या अॅपे रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा हवेत पाच फूट उंच उडून फेकली गेल्याने तिचे तुकडे तुकडे झाले. यावेळी झालेल्या आवाजाने परिसरातील शेतकरी जमा होऊन त्यांनी जखमींना बाहेर काढले.
मृतांमध्ये सचिन रवींद्र पटाईत (४), सुशांत रवींद्र पटाईत (२) रा.दोघे चंद्रमणीनगर, द्याने (मालेगाव), पवन नाना सावंत (२४, रा. आर्वीपूर), अॅपेरिक्षाचालक राजेंद्र रतन शिंदे (२५, रा. इंदिरानगर, दराणे - सटाणा) या चौघांसह एक ५५ वर्षीय महिला (ओळख पटलेली नाही) आणि एक २२ वर्षीय तरुण (अनोळखी) यांचा समावेश आहे.