गणेशोत्सवासाठी पीएमपीच्या सहाशे जादा गाडया
By Admin | Updated: August 29, 2016 17:26 IST2016-08-29T17:26:45+5:302016-08-29T17:26:45+5:30
वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठया प्रमाणात येतात.

गणेशोत्सवासाठी पीएमपीच्या सहाशे जादा गाडया
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठया प्रमाणात येतात. या भाविकांनी रात्री उशीरा पर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर त्यांना परत आपल्या गावी जाता यावे यासाठी पीएमपी प्रशासनाने कंबर कसली असून या वर्षी गणेशोत्सवाच्या शेवटाच्या आठ दिवसात पीएमपीकडून प्रतिदिवशी तब्बल 622 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. नियमित गाडयां व्यक्तीरिक्त या जादा गाडया असणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचा-यांच्या सुटटयाही प्रशसनाने रद्द केलेल्या आहेत. येत्या 8 ते 15 सप्टेंबर दरम्यान, शहरातील प्रमुख 13 डेपोंमधून या जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.