सहा ऊसतोड मजुरांचा कालव्यात बुडून मृत्यू

By Admin | Updated: February 20, 2015 01:21 IST2015-02-20T01:21:52+5:302015-02-20T01:21:52+5:30

ट्रॅक्टर कालव्यात उलटून बुधवारी झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या सातपैकी सहा जणांचे मृतदेह गुरुवारी कालव्यात तरंगताना आढळले. ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू आहे.

Six farmers drowned in the canal | सहा ऊसतोड मजुरांचा कालव्यात बुडून मृत्यू

सहा ऊसतोड मजुरांचा कालव्यात बुडून मृत्यू

टेंभुर्णी (सोलापूर) : उजनी कालव्याच्या पुलावरून नगर जिल्ह्यातील दहिगावाचे ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर कालव्यात उलटून बुधवारी झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या सातपैकी सहा जणांचे मृतदेह गुरुवारी कालव्यात तरंगताना आढळले. ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू आहे.
ट्रॅक्टरचा पाठलाग करणाऱ्या व दुर्घटनेस जबाबदार असणारे मुकादम (टोळीमालक) बाळासाहेब सोपान चंदनकर व बळीराम चंदनकर यांच्यावर टेंभुर्णी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी दुर्घटनेच्या ठिकाणापासून एका किलोमीटरवर रांझणी गावाजवळील पुलाजवळ शुभम बाळासाहेब गुंजाळ (५) याचा मृतदेह तरंगताना आढळला. तेथून पुढे काही अंतरावर हिरा राजू मोरे (२५), अर्जुन राजू मोरे (६) या मायलेकांचे मृतदेह आढळले. अकलूजजवळ कविता बाळासाहेब गुंजाळ (२५) व रांझणी पुलाजवळ कार्तिक राजू मोरे (४) आणि सुरेखा अंबादास गुंजाळ (३०, सर्व रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांचे मृतदेह
सापडले. (प्रतिनिधी)

गावाकडे जाताना काळाचा घाला
संबंधित मजूर तीन महिन्यांपासून आलेगाव (ता. माढा) येथील बाळासाहेब सोपान चंदनकर यांच्याकडे ऊसतोड करत होते. दररोज काम मिळत नसल्याने मुकादमाकडून घेतलेले पैसे कसे फेडणार, असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळे मुकादमाची नजर चुकवून हे मजूर दहिगावकडे निघाले होते. चंदनकर यांना हे समजताच त्यांनी मध्यरात्री ट्रॅक्टरचा पाठलाग केला. मात्र ते पाठलाग करत असल्याने घाबरलेल्या चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर कालव्यात उलटला.

 

Web Title: Six farmers drowned in the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.