सहा नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
By Admin | Updated: January 30, 2017 00:27 IST2017-01-30T00:27:41+5:302017-01-30T00:27:41+5:30
काँग्रेसमधून बाहेर पडलेले शिवेसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का दिला

सहा नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
सोलापूर : काँग्रेसमधून बाहेर पडलेले शिवेसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का दिला. कोठे गटाचे मानले जात असलेल्या काँग्रेसच्या सहा विद्यमान नगरसेवकांनी रविवारी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सादर केला. मनपा सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला हा खूप मोठा धक्का बसला आहे.
एकेकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे राइट हँड मानले जात असलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. विष्णुपंत कोठे यांचे पुत्र तथा नगरसेवक महेश कोठे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, त्यांच्या गटातील आणि त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे, विनायक कोंड्याल, राजकुमार हंचाटे, विठ्ठल कोटा, कुमुद अंकाराम आणि निर्मला नल्ला यांनी महेश कोठे यांचा सल्ला मानून आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा सादर केला. सहाही विद्यमान नगरसेवक आता शिवसेनेच्या वाटेवर असून, लवकरच त्यांचा पक्ष प्रवेशही निश्चित होणार आहे.