नगरमध्ये बालसुधारगृहातून सहा मुले पळाली
By Admin | Updated: May 31, 2015 01:47 IST2015-05-31T01:47:59+5:302015-05-31T01:47:59+5:30
येथील बालसुधारगृहातून (रिमांड होम) सहा मुलांनी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचे नाक-तोंड दाबून पळ काढला.

नगरमध्ये बालसुधारगृहातून सहा मुले पळाली
अहमदनगर : येथील बालसुधारगृहातून (रिमांड होम) सहा मुलांनी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचे नाक-तोंड दाबून पळ काढला. कर्मचाऱ्याच्या हातातील चाव्या हिसकावल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि भिंतीवरून उड्या मारून पसार झाले.
शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. सुधारगृहात असलेल्या मुलांनी तेथील बेरड दाजी असे नाव असलेल्या कर्मचाऱ्याला पाणी मागितले. बेरड हे पाणी देण्यासाठी मुलांची खोली उघडून आत गेले. त्यातील एका मुलाने त्यांचे नाक, तोंड दाबले. अन्य पाच मुलांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्या हातातील चाव्या मुलांनी हिसकावून सुधारगृहातून पळ काढला. (प्रतिनिधी)