खूनप्रकरणी सहा आरोपी निदरेष
By Admin | Updated: September 2, 2014 02:30 IST2014-09-02T02:30:42+5:302014-09-02T02:30:42+5:30
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत.

खूनप्रकरणी सहा आरोपी निदरेष
मुंबई : सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत.
14 आणि 15 जून 2क्क्6 दरम्यानच्या रात्री बाळू अमण्णा गावडे, त्यांची पत्नी शिरमाबाई, मुलगा सुनील, मुलगी छायाबाई उर्फ छकुली, विवाहित मुलगी जयश्री अमोल वाघमोडे आणि चुलती शांताबाई आनंदा गावडे या सहा जणांचा डोक्यात लाकडी सोटय़ाने प्रहार करून त्यांच्या राहत्या घरात खून करण्यात आले होते. कोणीही फोन उचलत नाही अथवा दरवाजाही उघडत नाही असे लक्षात आल्यावर काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला. घराच्या पाठीमागून जाऊन पाहिले असता छपराची काही कौले काढलेली आढळली व त्यातून आत पाहिले असता सहा जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले होते.
या खुनांबद्दल मृतांच्याच भावकीतील मनोज महादेव गावडे, महादेव अमण्णा गावडे, मालुबाई पांडुरंग गावडे, मंगल महादेव गावडे, सुरेश दत्तू गावडे आणि पोपट उर्फ नितेश महालू माने-वावरे अशा सहा आरोपींवर सांगली सत्र न्यायालयात खटला चालला होता. त्या न्यायालयाने मंगल व सुरेश यांना निदरेष ठरवून बाकीच्यांना जन्मठेप ठोठावली होती. सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध मनोज, महादेव, मालुबाई व पोपट यांनी केलेली अपिले मंजूर करून उच्च न्यायालयाच्या न्या. विजया कापसे ताहिलरामाणी व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने त्यांची निदरेष मुक्तता केली. त्यामुळे खुनांनंतर आता आठ वर्षानी सर्व आरोपी निदरेष ठरले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
खून झाले त्याच्या आदल्या संध्याकाळी मालुबाईने मयत झालेल्या सर्व व्यक्तींना आपल्या घरी चहासाठी बोलाविले होते. चहातून तिने त्यांना धोत्र्याच्या बियांची पूड खायला घातली. त्यामुळे बाळू गावडे व कुटुंबीय मूच्र्छितावस्थेत गेल्यावर डोक्यात सोडय़ाचे वार करून त्यांचे खून करण्यात आले, असे अभियोग पक्षाचे म्हणणो होते. मृतांच्या पोटातील अन्नांशातही धोत्र्याचे विष आढळले होते. ज्या झाडांची धोत्र्याची फळे काढली होती ती मालुबाईने स्वत:हून दाखविली व पोलिसांनी ती ताब्यातही घेतली होती. परंतु तरीही एवढय़ावरून मालुबाईने खुनांच्या आधी सर्वाना धोत्र्याचे बी खायला घातले हे निर्विवादपणो सिद्ध होत नाही, असे खंडपीठाने म्हटले.